मी या आंबेडकरनगराचा भाई आहे, अशा धमक्या देत परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फहिम फिरोज शेख (वय 18, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमनाथ अशोक सदाफुले (वय 22) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांचा मित्र काळु घोलप याच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवले होते. त्याचा राग आल्याने फहिम याने त्यांना अडवत त्यांच्यावर हल्ला केला. पण, तो वार चुकवून तक्रारदार पळाले असता त्यांच्या पायावर कोयत्याने वार केला. त्यावेळी ते खाली कोसळले. त्यानंतर रिक्षातून खाली उतरून कोयता हवेत फिरवून दहशत माजविली. तसेच, जमलेल्या नागरिकांना देखील धमकावत गोंधळ घालून तुफान राडा घातला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments