शाळेत जाताना १७ वर्षीय मुलीवर ॲसिड हल्ला

 


मास्कधारी दोन व्यक्तींनी दिल्लीमध्ये बुधवारी १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला केला. त्यात चेहरा, डोळ्याला गंभीर जखमा झालेल्या या मुलीवर सफदरजंग रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत.

हल्ल्याबाबत दोन संशयितांची नावे पीडित मुलीने पोलिसांना सांगितली असून त्यातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्याचा समाजातील सर्व स्तरांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

ही मुलगी धाकट्या बहिणीसोबत सकाळी शाळेत जात असताना दिल्लीतील उत्तमनगरामध्ये तिच्यावर ॲसिड हल्ला झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments