रामनगर येथे सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

 


विशाल गायकवाड (वय 38) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी या बाबतची प्राथमिक माहिती दिली. काल (शुक्रवारी) संध्याकाळी सातच्या सुमारास रामनगर येथे परशुराम चौकात सराईत गुन्हेगार विशाल गायकवाड याचा खून करण्यात आला. त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. गोळीबार झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

रामनगर येथे धोंडीबा दातीर पाटील मार्गावर परशुराम चौकाच्या एका बाजूला हा खून झाला. घटनास्थळी रक्त सांडल्याचे दिसत होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला.

या प्रकरणी  गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments