एका तरुणाला त्याची प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावला होता, लग्नापासून वाचण्यासाठी त्या तरुणाने त्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येचा उलघडा एका टी शर्टने केला आहे.
तरुण आणि तरुणी ओडिशामधील राहणारे होते, या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून प्रेम संबंध होते, तरुणीने लग्नासाठी तरुणाला तगादा लावला होता. यातून त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.
लग्न टाळण्यासाठी या तरुणाने भयानक प्लॅन बनवला. प्रेयसी तिच्या प्रियकरावर लग्नासाठी वारंवार दबाव टाकत होती. यामुळे त्रासून त्याने मुलीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. ओडिशातील रहिवासी असलेल्या आरोपीने आपल्या मैत्रिणीला गुजरातमधील सुरत येथे आणून तिची हत्या केली. तरुणीवर 49 वेळा हल्ला केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. त्यानंतर मृतदेह तेथे फेकून त्याने पळ काढला. मुलीच्या हत्येचा तपास करत असलेल्या पोलिसांना टी-शर्टमुळे आरोपीपर्यंत पोहोचता आले. सध्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना 28 नोव्हेंबर रोजी अमरोली परिसरात घडली.
0 Comments