शेअर मार्केट मध्ये गुतवणुकीच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक



 शैलेंद्रकुमार शांतीलाल मेहता (वय 45, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी मिलिंद बाळासाहेब गाढवे (रा. सांगली) यांच्याविरोधात पिंपरी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गाढवे याने लक्ष्मण शेंडे या व्यक्तीच्या मध्यस्थीने मेहता यांच्याशी ऑनलाईन माध्यमातून संपर्क करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल. एका वर्षात गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होईल, असे आमिष दाखवून मेहता यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

मेहता यांनी 19 लाख 52 हजार 500 रुपये गुंतवले असता गाढवे याने मेहता यांच्या नावाने मेटा ट्रेडर 5 यावर खाते तयार केले. त्याचे नियंत्रण मेहता यांना न देता त्यांनी गुंतवलेल्या रकमेचा गाढवे याने अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments