महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या दोघांना अटक

 


याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मॅनेजर उत्तम बाबुराव पवार (वय 48 रा. तळवडे) व अकाऊंट मॅनेजर जयंत जयदेव बर्मण (वय 30 रा. तळवडे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एकट्या ऑफीसमध्ये असताना उत्तम याने फ्रेंडशीपची मागणी करत पीडितेशी गैरवर्तन केले. हा प्रकार पीडेतेने जयंत याला सांगितला असता त्यानेही पीडीतेशी तशीच मागणी करत पीडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न केली. यावरून चिखली पोलिसांनी दोन्ही आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे.


Post a Comment

0 Comments