उमरखेड: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पिक मिळवून देण्यासाठी सर्वोतपरि प्रयत्न करणार - आमदार नामदेव ससाने


उमरखेड  (विठ्ठल खंदारे) :- उमरखेड व महागांव तालुक्यातील अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी आज तहसील कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 या बैठकीमध्ये उमरखेड विधानसभा चे आमदार नामदेव ससाने यांनी विमा कंपनीचे प्रतिनिधी अभय कदम यांच्या कडुन  नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या पिक विमा विषयी माहिती विचारली.विमा कंपनी चे प्रतिनिधी यांनी सांगितलं की ५०हजार शेतकऱ्यांन पैकी ४३६८९ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता ३२६८९ शेतकऱ्यांना ३२कोटी ५०लाख ९० हजार ७५७ रुपये यांचे वाटप करण्यात आले असुन ११ हजार शेतकरी शिल्लक राहिले असुन सरकार कडुन अनुदानित रक्कम भेटल्यावर ती रक्कम उर्वरित नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येईल.

 तसेच महागांव तालुक्यातील १० हजार नुकसानग्रस्त शेतकरी बाकी आहे. या सर्व शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई भेटण्यासाठी आपण सर्वोतपरि प्रयत्न करणार असुन कोणाचाही नुकसान होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्धास्त रहावे असे आवाहन आमदार नामदेव ससाने यांनी या वेळी केले. या बैठकीसाठी आमदार समवेत तहसीलदार आनंद देऊळगांवकर, तालुकाध्यक्ष सुदर्शन रावते, जिल्हाउपाध्यक्ष दत्तदिगंबर वानखेडे, विमा कंपनीचे प्रतिनिधी अभय कदम उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments