विषारी दारूने घेतला २५ जणाचा बळी...

 


दारूबंदी लागू असूनही बिहारमध्ये छपरा जिल्ह्यात विषारी दारूमुळे २५ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यात विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच असली तरी जिल्हा प्रशासनाने याबाबत मौन बाळगले आहे. या प्रकरणी पिता-पुत्रासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवरून राजकारण तापले असून, भाजप सरकारच्या कालावधीतही अशा घटना घडल्या होत्या, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिले आहे.

सर्व मृतांनी सोमवारी रात्री उशिरा मद्यप्राशन केले होते. त्यानंतर मंगळवारी ते आजारी पडले. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. या घटनेतील १५ जण अत्यवस्थ आहेत व इतर अनेक जण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. अनेकांचे डोळे गेले आहेत तर काही जण प्राणास मुकले आहेत.


Post a Comment

0 Comments