आईकडून तीन वर्षाच्या लेकीची हत्या

 


आई जितकं आपल्या मुलांवर प्रेम करते तितकं कुणीच करु शकत नाही असं म्हणतात. आई मायेचा सागर असतो. मात्र यवतमाळमध्ये एका आईने चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

यवतमाळच्या आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खंडाळा येथे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी तीन वर्षाच्या चिमुरडीला उलट्या होत असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत चिमुरडीच्या आईने देखील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान तब्बल एक वर्षानंतर शवविच्छेदन व विकृतीशास्त्र विभागाच्या अहवाल वरून स्वतःच्या जन्मदात्या आईनेच विषारी औषध देऊन त्या मुलीची हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहेत.

Post a Comment

0 Comments