तीन महिलांसोबत करत होता पार्टी , अचानक दोघांना झाला मृत्यु , दोन महीला गंभीर

 


हरियाणामधील गुरुग्राम येथील नाईट क्लबमध्ये पार्टी करत असलेला क्लबचा मालक आणि त्याच्या एका मैत्रिणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला आहे. सोमवारी संध्याकाळी दोघांचे मृतदेह क्लबच्या खोलीमध्ये सापडले.

दरम्यान, त्यांच्यासोबत पार्टी करत असलेल्या अन्य दोन महिलाही गंभीर अवस्थेत सापडल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या क्लबच्या मालकाचे नाव संजीव जोशी आहे. या प्रकरणी एसीपी डीएलएफ विकास कौशिकने सांगितले की, मृत संजीव हा त्याच्या तीन मैत्रिणींसह रविवारी रात्री नाईट क्लबमध्ये आला होता. तिथे एका मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी केली जात होती. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी संजीव आणि त्याच्या एका मैत्रिणीचा मृतदेह सापडला. ज्या मैत्रिणीचा वाढदिवास होता तिचाच हा मृतदेह होता. तर याच खोलीत दोन इतर महिलाही गंभीर अवस्थेत सापडल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

एसीपी विकास कौशिक यांनी सांगितले की, ज्या खोलीमध्ये सर्वजण पार्टी करत होते तिथे अंगीठी (विस्तव) जळत होता. रात्री उशिरा सर्वजण येथे पार्टी करण्यासाठी आले होते. त्यानंतर काल संध्याकाळी दोघांचे मृतदेह सापडले. तर दोघीजणी गंभीर अवस्थेत सापडल्या. विस्तवाच्या धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

आता मृतदेहांचं शवविच्छेदन केले जात आहे. त्यानंतरच मृत्यबचं खरं कारण समोर येईल. सध्यातरी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नाईट क्लबमधील लोकांची चौकशी केली जात आहे.


Post a Comment

0 Comments