वऱ्हाडाच्या बसला खोपोलीत भीषण अपघात, चालकाचा मृत्यु ,२२ जण जखमी

 


लग्नाहून परतत असलेल्या बसचा आणि कंटेनरचा मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीनजिक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कंटेनरच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण जखमी आहेत.

यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, बसच्या मागील बाजूचा चक्काचूर झाला असून ज्या कंटेनरने धडक दिली त्या कंटेनरच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.

सिंधुदुर्गहून एक बस मुंबईच्या दिशेने परतत होती. या बसमध्ये लग्नाचं वऱ्हाड होतं. ही बस शहापूर-वाशिंदजवळ परतली असता एका कंटेनरने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. ही धडक एवढी जोरदार होती की बसच्या पाठीमागच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तर, कंटेनरचा पुढचा भाग पूर्णपणे कोसळला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, बसमधील २२ प्रवासी जखमी आहेत. यापैकी ४ प्रवाशांना उपचारांसाठी एमजीएम रुग्णालयात नेलं असून एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. तर, १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. तर, इतर सहा जखमींवर खोपोली नगरपालिकेच्या रुग्णलायात उपचार सुरू आहेत.


Post a Comment

0 Comments