२५ कोटी रुपयांचा गुंतवणूकदाराला चुना

 


बांधकाम व्यावसायिकाला चार वर्षे व्यावसायिक गुंतवणूक करण्यास सांगत २५ कोटी १९ लाख रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेतली.

त्यानुसार मे. झीअस हाउसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनी आणि त्याच्या संचालकांवर शनिवारी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू आहे.

या प्रकरणातील फिर्यादी अतुल पटेल (५४) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. मे. झीअस हाउसिंग अँड कन्स्ट्रक्शनचे संचालक आशित दोशी आणि मनीष शहा यांनी सायन कोळीवाडा येथील एका प्लॉटवर विक्री करायच्या एकूण क्षेत्रापैकी कमी क्षेत्र विक्री केले आहे. त्यानुसार त्यामधील २० टक्के बांधकाम क्षेत्र पटेल यांना देऊ असे आमिष दाखविले. त्यानंतर पटेल यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र बांधकामाच्या क्षेत्राची निश्चिती होण्याआधीच पटेलांच्या संमतीशिवाय सेलेबल इमारतीमधील सदनिकांची आरोपींनी विक्री केली.


Post a Comment

0 Comments