हॉटेल व्यावसायिकाचा घरातून साडे चार तोळे सोने चोरीला

 


याप्रकऱणी चाकण पोलीस ठाण्यात संदीप शांताराम साकोरे (वय 32 रा.निघोजे) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलुप लावून बंद असताना चोरट्यांनी दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरात प्रेवेश केला, त्यांनी घरातून 4 तोळे 5 ग्रॅम वजनाचे 67 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments