याप्रकरणी पिंपरी पोलीसात 18 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून मंगेश अचूत राऊत (रा.भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा पाठलाग करून आरोपीने फिर्यादीचा हात धरला तिच्याशी गैरवर्तन केले. यावेळी फिर्यादीने त्याला विरोध केला असता तू पोलीस कम्प्लेंट करायची नाही, तुला सोडणार नाही, पोलीस माझ काही नाही करू शकत अशी धमकी दिली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments