कामाचे पैसे मागितले म्हणुन महिलेला शिवीगाळ करत धक्काबुक्की

 


पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून विनोद किसनचंद मतानी (वय 42) व त्याचा मोठा भाऊ सुनिल किसनचंद मतानी (वय 45) दोघे राहणार पिंपरी गाव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या नंणदेसोबत आरोपीच्या घरी त्यांच्या कामाचे पैसे मागण्यासाठी गेल्या होत्या. पैसे मागताच दोन्ही भावांनी फिर्यादीला अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, विनोद मतानी हा फिर्यादीच्या अंगावर धावून गेला व त्याने फिर्यादीच्या अंगावर हात टाकत त्यांच्या ड्रेसची डावी बाजू फाडली. हा सारा प्रकार फिर्यादीच्या डोळ्यासमोर होत असल्याने त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments