पावणेदोन लाखांचे मंगळसूत्र चोरीला

 


बंडगार्डन येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळील बसस्थांब्यावरून बसमध्ये चढत असताना बुधवारी एका महिलेच्या पर्समधील एक लाख 80 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरी केले.

याप्रकरणी माहुली सातारा येथील 52 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला बसमध्ये चढत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी त्यांचे लक्ष चुकवून त्यांच्या पर्सची चैन खोलून मंगळसूत्र चोरी केले.


Post a Comment

0 Comments