दरोड्यातील तिघेजण जेरबंद

 


इंदापूर तालुक्‍यातील खोरोची येथे 13 डिसेंबर रोजी पहाटे वयोवृध्द जोडपे राहत्या घरासमोर झोपलेले असताना दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली.

यात 70 वर्षीय आजोबांचा मृत्यू झाला. तर आजी गीींर जखमी झाल्या. याबाबत इंदापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या 72 तासांत तपास करून तिघा आरोपींना अटक केली आहे.

दयाराम नारायण कणीचे (वय 70) असे या घटनेत मृत्य झालेल्यांचे नाव असून, जनाबाई दयाराम कणीचे (वय 65) या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी तुषार दादासो चव्हाण (वय 22, रा. फोंडशीरस, पाटीलवस्ती, ता. माळशिरस), रोहन उर्फ सोन्या शिवाजी जाधव (वय 19) आणि नितीन बजरंग जाधव (वय 27, दोघे रा. खोरोची) अशी अटक केलेल्या नावे आहेत.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अपर पोलीस अधीक्षक आनंदराव भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व इंदापूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक अमित सिद पाटील,

शिवाजी ननवरे, सहायक उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, हवालदार सचिन घाडगे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, विजय कांचन, एम. आय. मोमीन, अजित भुजबळ, आसिफ शेख, योगेश नागरगोजे, चंद्रकांत जाधव, अजय घुले, कॉन्स्टेबल धीरज जाधव, दगडु विरकर, काशीनाथ राजापुरे, अक्षय सुपे व इंदापूर पोलीस स्टेशन कडील सहायक निरीक्षक नागनाथ पाटील, हवालदार नानासाहेब आटोळे, पोलीस नाईक सलमान खान, कॉन्स्टेबल विशाल चौधर व सहा फौजदार शिवाजी निकम, वालचंदनगर पोलीस स्टेशन अशी चार पथके नेमून तपास सुरू केला होता.

या तपास पथकाने आरोपीबाबत माहिती काढण्याकरिता इंदापूर परिसरातील गोपनीय बातमीदारांना सक्रीय करून, इंदापूर परिसरातच मुक्काम करून माहिती घेतली. अशाप्रकारे गुन्ह्याचा शोध सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हा गुन्हा तुषार चव्हाण याने त्याचे साथीदार रोहन आणि नितीन यांच्यासह मिळून केला असल्याची माहिती मिळाली. ‘


Post a Comment

0 Comments