पैशाच्या हव्यासातून कोण काय करेल, याचा नेम नाही. अशावेळी रक्ताच्या नात्याचा देखील लोकांना विसर पडतो. पैसा हा कळीचा मुख्य कारण असते. अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनात पैशाच्याच कारणावरून वाद किंवा रक्तरंजित घटना घडल्याचे आपण पाहत असतो.
अशीच एक पैशाच्या हव्यासातून पश्चिम बंगालमध्ये घडलेली धक्कादायक घटना उजेडात आली आहे. येथील नदिया जिल्ह्यातील नवद्वीप परिसरामध्ये एका महिलेने तब्बल 75 लाख रुपयांची लॉटरी जिंकली होती. तिच्या या लॉटरीच्या पैशाच्या हव्यासातून महिलेच्या मुलानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रेयसीच्या मदतीने त्याने आपल्या जन्मदात्रीची हत्या केली.
0 Comments