हिम्मतवाली खचली..... अन् जीवन संपविले

 


'ती' अत्यंत हुशार आणि हिम्मतवाली... अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण हाेणाऱ्या 'तिने' उच्च शिक्षणाचे ध्येय मनाशी बाळगले.

मात्र, घरात अठराविश्वे दारिद्र्ये... ही जाणीव ठेवत तिने शिक्षण घेण्याच्या मार्गातील आतापर्यंतचे अडथळे दूर केले. मात्र, उच्च शिक्षणातील अडथळे दूर हाेणार नाहीत, ही खंत मनात खाेलवर रुतल्याने 'तिने' टाेकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपविली. संजना ऊर्फ मेघना संजय सातपुते (२०, रा. जलालखेडा, ता. नरखेड, जि. नागपूर) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

संजनाला दहावी-बारावीमध्ये ८५ टक्के गुण मिळाले. त्यानंतर तिने बीएस्सीला प्रवेश घेतला. पण कोरोनाकाळात मजुरी करून मोबाइल खरेदी केला व ऑनलाइन परीक्षा दिली; पण प्रथमवर्षाचा पेपर सबमिट न झाल्याने प्रवेश हुकला. पुढे कॉम्प्युटरसाठी प्रवेश घेतला; परंतु बस पाससाठी पैसे नसल्याने हे ध्येय पूर्ण करता आले नाही.


Post a Comment

0 Comments