प्रेमी युगुलाच पोलिस ठाण्यातच' शुभमंगल सावधान! घरच्या मंडळीचा लग्नाला विरोध , काय घडलं

 


आम्ही दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो, आम्हाला लग्न करायचे आहे" असे सांगत एक जोडपं चक्क वाशिमच्या शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये आलं.

प्रेमी युगुलांची भावना लक्षात घेता पोलिसांनी  देखील दोघांचा चक्क पोलीस ठाण्यातच विवाह लावला. काय घडलं नेमकं?

घरून पळून गेलेल्या एका प्रेमी युगुलाचा विवाह वाशिमच्या शिरपूर पोलीस स्टेशन परिसरात पार पडला. शिरपूर गावातील एका 21 वर्षीय तरुणीच गावातील एका 23 वर्षीय युवकासोबत प्रेम जडले. प्रेमाच्या आणाभाका घेत दोघे घरातून लग्न करण्यासाठी बाहेर पडले. मात्र घरच्या मंडळीला हे लग्न मान्य नसल्याने या प्रेमी युगुलाने पोलीस स्टेशन गाठत पोलिसांच्या साक्षीने लग्न केलं. कुटुंबियांकडून नववधूला त्रास देणार नाही, अशी हमी पोलिसांकडून दिल्यानंतर नवदाम्पत्य वर-वधू आनंदाने घरी गेले


Post a Comment

0 Comments