देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून हत्येच्या, आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत.
त्यात आता आणखी एक भयानक घटना उघडकीस आली आहे. हरियाणातील सोनीपत येथील बंद पीजीमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तपास सुरू केला. दरम्यान, मृत महिला विवाहित असून ती दिल्लीची रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तिचे रवी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तसेच रवी हा जेसीबी चालक होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.दरम्यान, आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याचे मृत महिलेशी प्रेमसंबंध होते आणि तो तिच्यावर एकत्र राहण्यासाठी दबाव टाकत होता.
मात्र, लक्ष्मी आधीच विवाहित होती आणि तिला चार मुले होती. म्हणूनच तिला त्याच्यासोबत राहायचे नव्हते. यादरम्यान, गेल्या शनिवारी त्याने लक्ष्मीला मुरथळ रोडवरील बंद पीजीमध्ये नेले तेथे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि रवीने लक्ष्मीचा ओढणीने गळा दाबून खून केला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणाची माहिती देताना डीएसपी रमेश कुमार म्हणाले की, दिल्ली कॅम्पमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी नावाच्या महिलेचा मृतदेह मुर्थल रोडवरील बंद पीजीमध्ये आढळून आला. तपासादरम्यान रवी नावाच्या व्यक्तीने गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी रवीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्याचे मृत महिलेशी प्रेमसंबंध होते.
तो तिच्यासोबत राहण्यासाठी दबाव टाकत होता. पण लक्ष्मी आधीच विवाहित होती आणि तिला चार मुले होती. त्यामुळे ती त्याच्यासोबत राहण्यास नकार देत होती. यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि रवीने ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
0 Comments