विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी

 


अनेकदा क्षुल्लक कारणावरून झालेला वाद सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यातही कॉलेज भांडणाचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.

कधी बॉयफ्रेंडवरून, तर कधी जेलसीवरून तर कधी रस्त्यावर ही भांडण पाहायला मिळतात. अशातच कुणी भांडणाचा व्हिडिओ काढून सोशल मिडीयावर टाकल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला आहे.

साऊथ चित्रपटात सुध्दा पाहायला मिळणार नाही अशी दौंड तालुक्यातील वरवंड मधील विद्यार्थांची तुफान हाणामारी दोन गटात झाली आहे. शाळा आणि महाविद्यालयामधील एका गटाने दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केले.

आजूबाजूच्या नागरिकांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला तरीही विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे ही मुलं शाळेत शिकायला जातात की हाणामारी करायला जातात असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकच्या एका नामांकित कॉलेजमध्ये मुलींची फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. आज सकाळपासून फेसबुक, व्हाटसप वर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून छोट्या गोष्टींवरून झालेले हे भांडणं विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे.

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका कॉलेजमध्ये हा तुफान राडा झाला आहे. यात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणीची त्रेधातिरपीट उडाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तर व्हिडीओत दिसणाऱ्या दुसऱ्या दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत असताना दिसत आहे. तर दुसरीकडे सकाळची वेळ असल्याने कॉलेजचा हजारो विद्यार्थ्यांचा गराडा या तरुणींचे भांडण पाहत व्हिडीओ काढत असल्याचे दिसते आहे.


Post a Comment

0 Comments