केक आणायला जाताना अपघात , दोघांचा मृत्यु

 


हिंगोली ते नांदेड या मुख्य रस्त्यावर एका खासगी शाळेजवळ असलेल्या वळणावर ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या धडकेत मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली.

मृतातील एकाचा त्याच दिवशी वाढदिवस होता. सोड येथील सतीश संभाजी मोगले (वय 25) व अमोल प्रकाश मोगले (वय 23) असं या दोन्ही तरुणांची नांव आहेत हे दोघे कळमनुरी येथे सतीश मोगलेच्या वाढदिवसासाठी केक आणण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला.


Post a Comment

0 Comments