गर्लफ्रेंडचा मृतदेह खड्ड्यात पुरला आणि त्यावर मीठ टाकलं .....

 


देशात लग्नसराई सुरु आहे. अनेक कपल रिल मधून आता रियल कपल होत चालले आहेत. अशाच एका रियल कपल होण्याच्या प्रयासात असणाऱ्या एका बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडची  हत्या केल्याची घटना घडलीय.

घटनेने संपुर्ण राज्य हादरलय. दरम्यान या बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या का केली? दोघांमध्ये नेमका काय वाद झाला होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा उलगडा कसा केला आहे, हे जाणून घेऊयात.

24 वर्षीय जसप्रीत कौर या मुलीचे  21 वर्षीय परमप्रीत सिंह याच्यासोबत प्रेमसंबंध होते. एके दिवशी परमप्रीतने जसप्रीतला लग्न करण्याच्या बहाण्याने बोलावले आणि आपल्या मित्रांच्या सहाय्याने तिची हत्या केली.या हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह कालव्यात फेकला. या कालव्यातून पुन्हा मृतदेह बाहेर काढत तो जमीनीत पुरला आणि त्यावर मीठ टाकलं. यानंतर सर्व मित्रांनी मृतदेह गाठलेल्याच ठिकाणी जंगी दारू पार्टी केली.

बॉयफ्रेंडन परमप्रीतने गर्लफ्रेंड  जसप्रीतला लग्न करण्याच्या बहाण्याने बोलावले होते.यासाठी गर्लफ्रेंड घरातून 12 तोळा सोन आणि 20 हजार रोख रक्कम घेऊन पोहोचली होती. दोघेही कारमधून जात होते. यावेळी रस्त्यात बॉयफ्रेंडने आपल्या मित्रासोबत मिळून तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर मग बॉयफ्रेंडच्या मित्रांनी मिळून मृतदेह कालव्यात टाकला होता. मात्र कालव्यात पाणी कमी असल्याने हत्याकांड उघड होण्याची भीती होती. या भीतीपोटी पुन्हा मृतदेह ताब्यात घेत जमीनीत पूरला. हा मृतदेह पुरल्यानंतर त्याने त्याच्यावर मीठ टाकल होते.

जसप्रीत कौर  24 वर्षांची होती. तिचे आई-वडिल तिच्या लग्नाची बोलणी करत होते. मुलाची शोधाशोध सुरु होती. यामुळे ती 21 वर्षीय परमप्रीत वर लग्नाचा दबाव टाकत होती. ती सतत त्याला कुटूंबियांशी त्याच्या नात्याबद्दल सांगण्यास सांगत होती. मात्र तो लग्न करण्यास टाळाटाळ करत होते. अखेर त्याने वैतागून तिचा काटाच काढला.

दरम्यान मुलगी घऱी येत नसल्याचे पाहून कुटूबियांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासात त्यांना गर्लफ्रेंड त्याच्या बॉयफ्रेंडसोबत  स्मार्टफोनद्वारे संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केला असता घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपी बॉय़फ्रेंडसह त्यांच्या साथिदार मित्रांना ताब्यात घेतले.

या घटनेनंतर आरोपींनी कबूल केले की, तरूणी सतत लग्नासाठी ब्लॅकमेल करत असल्याने त्याने तिची हत्या केली. मात्र त्याला आता या घटनेचा पश्चाताप होत असल्याचे देखील त्याने सांगितले. पोलिसांनी या घटनेत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे,


Post a Comment

0 Comments