मोटार - दुचाकीची समोरासमोर धडक , दोघांना पन्नास फूट फरफटत नेले

 


कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये मोटार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन सहाजण गंभीर जखमी झाले. मोटारीची धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील पंकज कुमार व सोनू कुमार (सध्या रा.

मेट्रो पार्क) 50 फुटांपर्यंत फटफटत गेले. जखमींच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सकाळी अकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

कागल पंचतारांकित एमआयडीसीतून ही मोटार जवाहर कारखान्याच्या दिशेने चालली होती. त्याचवेळी एक दुचाकी वळण घेत असताना मेट्रो हायटेकसमोर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. दुचाकीवरील पंकज कुमार व सोनू कुमार 50 फुटांपर्यंत फरफटत गेले; तर मोटारीतील पंकज पाटील, किरण सणगर, सिद्धार्थ कांबळे, सुजित जांभेकर जखमी झाले. अपघातानंतर मोटार दुभाजकाला धडकल्याने एअर बॅग उघडून आतील प्रवासी बचावले. अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली.


Post a Comment

0 Comments