रात्री प्रेयसीच्या बेडरूममध्ये पोहचला प्रियकर, सकाळी लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

 


बिहारच्या मोतिहारी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाची हत्या करण्यात आली आणि मृतदेह त्याच्या प्रेयसीच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृतदेह बाहेर काढल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आणि लोकांची गर्दी झाली. ही घटना पूर्व चंपारण जिल्ह्यातील घोरासहन पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलीस ठाण्याच्या धुमनगर गावात ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलिसांनी एका तरुणाचा फासावर लटकलेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह गावातीलच राजवंशी यादव यांचा 16 वर्षीय मुलगा सनी कुमारचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, त्याच गावातील राजा ठाकूर यांच्या मुलीसोबत सनीचे प्रेमसंबंध होते असे सांगितले जात आहे. रात्री उशिरा जेवण करून सनी घरातून हॉलमध्ये झोपण्यासाठी निघाला, मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह शेजारच्या घरात आढळून आला. बंद खोलीत मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली. रात्रीच्या अंधारात सनी आपल्या प्रेयसीच्या बेडरूममध्ये पोहोचला होता, ज्याला संबंधित प्रेयसीच्या आईने पाहिले होते. यानंतर दोघांनाही खोलीतच बाहेरून कोंडून ठेवण्यात आले. अन् दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीत मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.


Post a Comment

0 Comments