जमिनीच्या वादातून पत्नीने घेतला पतीचा चावा

 


जमिनीच्या वादातून महिलेने आपल्या पतीच्या बोटाला व गालाला चावा घेतल्याची खळबळ जनक घटना भिवंडीत रविवारी घडली असून याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात सोमवारी पत्नीसह मुलाविरोधात जखमी वृद्धाने गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश मारुती ठाकूर वय ६७ वर्ष रा ठाकऱ्याचा पाडा भिवंडी असे पत्नीने चावा घेतलेल्या वृद्ध पतीचे नाव आहे तर सुनंदा प्रकाश ठाकूर वय ५५ वर्ष व स्वप्नील प्रकाश ठाकूर वय १९ असे गुन्हा दाखल झालेल्या पत्नी व मुलाचे आहे.

प्रकाश ठाकूर यांच्या कुटुंबीयांच्या सामायिक जमिनीवर पत्नी सुनंदा ठाकूर यांनी आपल्या नावावर जमीन करण्याचा तगादा प्रकाश ठाकूर यांना लावला होता, मात्र सदरची जमीन ही कुटुंबीयांची सामायिक जमीन असल्याने याबाबत घरातील मंडळींना एकत्र करून याबाबतचा निर्णय घेऊ, असे प्रकाश यांनी आपली पत्नी सुनंदा यांना समज दिली होती.मात्र त्यात सुनंदा यांचे समाधान न झाल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले व सुनंदा यांनी पती प्रकाश ठाकूर यांच्या डाव्या हाताच्या तर्जनी बोटास व उजव्या गालाला चावा घेऊन प्रकाश ठाकूर यांना जखमी केले तर मुलगा स्वप्नील ठाकूर याने जमीन आईच्या नावावर केली नाही तर बघून घेईन अशी धमकी देत शिवीगाळ केली.याप्रकरणी जखमी प्रकाश ठाकूर यांनी पत्नी व मुला विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


Post a Comment

0 Comments