भरधाव ट्रकने दोघांना चिरडले ,2 जखमी

 


धुळे- बंद पडलेल्या ट्रकचे काम करत असताना चौघांवर काळाने घाला घातला. यात दोन जणं ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गवरील वरखेडी उड्डाणपुलाच्या खाली मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली 

मयत झालेल्यांमध्ये विजय तानाजी पाटील (३३, रा. अवधान) आणि मध्यप्रदेश येथील कॅसिल भवर या दोघांचा समावेश आहे. तर जखमीमध्ये रमाकांत तोताराम पाटील असून दुसऱ्याचे नाव समजू शकलेले नाही.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वरखेडी उड्डाणपुलाच्या खाली एक ट्रक बंद पडलेला होता. या ठिकाणी गॅरेज असल्यामुळे काम सुरु होते. सायंकाळी उशिर झाल्यामुळे अंधार होता. त्याचवेळेस मालेगावकडून शिरपूरच्या दिशेने एक ट्रक भरधाव वेगाने येत होता. अंधार असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने बंद पडलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात दाेन जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. जखमीपैकी एकाची ओळख पटली नव्हती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले.


Post a Comment

0 Comments