सोन्याचे बिस्किट देतो, असे सांगून ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 1 लाख रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेत फसवणूक केल्याची घटना मंचर-घोडेगाव रस्त्यावर घडली आहे
बाबत इंदुमती काशिनाथ निघोट ( वय 66, रा. निघोटवाडी, मंचर, ता. आंबेगाव ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
निघोट या पुण्याहून बहिणीच्या घराच्या घोडेगाव येथील वास्तुशांतीच्या कार्यक्रमाकरिता एसटी बसने मंचर येथे आल्या होत्या. सकाळी साडेदहा वाजता मंचर-घोडेगाव रस्त्यावर चालत असताना नवनाथ हॉटेलच्या कडेला त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटला .त्याने निघोट यांना काकू तुम्ही जरा साईडला या तुमच्याकडे काम आहे .असे म्हणत त्यांना बोलावले व माझ्याकडे दोन सोन्याची बिस्किटे आहेत.
असे म्हणून खिशातून गुलाबी रंगाचे कागदात असलेली खोटी सोन्याची बिस्किटे दाखवली. त्यावेळी तिथे दुसरा एक व्यक्ती आला व त्याने मावशी मी माझ्याकडे एक सोन्याची चैन व अंगठी देऊन या माणसाकडून एक सोन्याची बिस्कीट घेतो. दुसरे बिस्कीट तुम्ही घ्या असे सांगितले. त्यावेळी निघोट यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून गळ्यातील अडीच तोळेची सोन्याचे गंठण देऊन सोन्याचे बिस्किट घेतले.
त्यानंतर ते दोघेही व्यक्ती त्या ठिकाणावरून निघून गेले. फिर्यादी निघोट या सोन्याचे बिस्किट खरे आहे की खोटे हे तपासण्यासाठी पूजा ज्वेलर्स मंचर येथे गेल्या असता सोनाराने बिस्कीट खोटे असल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मंचर पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे.
0 Comments