नाशिकमध्ये पुष्पा, चा कारनामा , मद्याच्या वाहतुकीसाठी अनोखी शक्कल , पोलिसही चक्रावले

 


पुष्पा  चित्रपटाचा फिव्हर अद्यापही अनेकांच्या डोक्यात तसाच असल्याची अनेक उदाहरणे वारंवार घडताना दिसत आहेत. पुष्पा चित्रपटानंतर अनेक भामट्याना पोलिसांना गुंगारा देऊन अवैध वाहतूक  करताना ताब्यात घेतले आहे.

अशाच एका पुष्पाला नाशिकमध्ये  राज्य उत्पादन शुल्कने ताब्यात घेतले आहे. मद्याच्या वाहतुकीसाठी या पुष्पाने अनोखी शक्कल वापरल्याने पोलीस देखील काही वेळ चक्रावले.

नाशिकग्रामीण पोलीस सध्या अवैध धंद्याच्या समूळ उच्चाटन साठी विशेष मोहीम राबवित आहेत. त्याच पद्धतीने राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा भामट्यांच्या मागावर असताना अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पालघर  येथील मद्य तस्कराने टेम्पोमध्ये 12 प्लास्टिकच्या ड्रममध्ये साबण बनविण्याच्या जेलीच्या पाकिटातून महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या तब्बल 1920 मद्याच्या बाटल्या वाहतूक करतांना राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाला मिळून आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील कसबे वणी गावात एका हाॅटेलच्या समोर ही कारवाई केली.

राज्य उत्पादन शुल्क  विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विभागाच्या कळवण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली. एका टेम्पो मधून मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याचे गुप्त माहिती मिळालाय. त्यानुसार पथकाने वणी दिंडोरीरोडवर सापळा रचला. काही वेळातच या मार्गावरून संशयित टेम्पो येताना दिसून आल्याने त्याला थांबवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता टेम्पोमध्ये 12 प्लास्टिकचे सीलबंद ड्रम आढळून आले. वाहन चालक संशयित दिनानाथ सीताराम पाल याकडे चौकशी केली असता ड्रममध्ये साबण निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या जेलची पाकिटे असल्याचे सांगितले. त्यामुळे सुरवातीला ड्रममध्ये खरोखर जेली पाकिटे असावी असे पथकाच्या अधिकाऱ्यांना वाटले होते.

मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी सहजच एक ड्रम उघडण्यास सांगितला असता चालकाने नकार दिल्याने पथकाला संशय आला. पोलिसांनी तात्काळ ड्रमचे सील तोडून पाहिले असता जेलीच्या पाऊचमध्ये मद्याच्या बाटल्या असल्याचे आढळून आले. 12 ड्रम मधून दादरा व नगर हवेली निर्मीत विदेशी मद्याचे 1920 बाटल्या पथकाने जप्त केल्या. अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या चालकाकडून वाहन मालक, मद्यसाठा पुरवठादार आणि मद्य खरेदी करणारे ज्ञान अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments