प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या

 


विवाहबाह्य संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. आरोपी प्रियकर हा मृत व्यक्तीचा जुना मित्र असल्याचे तपासात उघड झाले.

पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हत्येचा संशय येऊ नये यासाठी आरोपींनी कट रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि तपास सुरू केला.

कमलकांत शाह असे मृताचे नाव असून त्यांचा कवितासोबत 2002 मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मृत कमलकांत शाह आणि आरोपी हितेश जैन यांची मैत्री होती. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या मैत्री झाली होती. त्यातच मृत कमलकांत यांची पत्नी कविता उर्फ काजल आणि हितेश जैन यांच्यात विवाहबाह्य प्रेम संबंध तयार झाले होते. जवळपास 10 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर कमलकांत यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे. प्राथमिक तपासातून पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली आहे.


Post a Comment

0 Comments