पाण्याच्या टाकीत सापडली अश्विनीची बॉडी, कॉलनीत उडाली खळबळ

 


नगरच्या रत्नदीप कॉलनी संकुलात पाण्याच्या टाकीत युवतीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची माहिती समजताच एसीपी पूनम पाटील या स्वत: घटनास्थळी पाेहचल्या.

सध्या पाेलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

अश्विनी गुणवंत खांडेकर असे मृत युवतीचे नाव आहे. आज सकाळी तिचे मामा तोंड धुण्यास गेले असता त्यांना पाण्यातून दुर्गंधीयुक्त वास आला. त्यांनी पाण्याची  टाकी पाहिली. त्यात अश्विनीचा मृतदेह दिसून आला.

अश्विनीने इंजिनियरिंग केले होते. तसेच मुंबई, दिल्लीत आर्टीटेकट सुद्धा केले होते. तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक होतें. त्यांचा मृत्यु झाल्यानें घरात अश्विनी भाऊ आणि आई असे एकत्र राहत

ती काही दिवसांपुर्वी बेपत्ता हाेती. त्याबाबत गाडगे नगर पोलीसांत नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. दरम्यान आज तिचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी शहर पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, डिसीपी पाटिल, एसीपी पूनम पाटील, गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक अर्जून ठोसरे, गाडगे नगर पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले घटनास्थळी दाखल झाले

घटनास्थळी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी करुन नातेवाईकांची चाैकशी केली. घटनास्थळी श्वानपथक फिंगर प्रिंट पथक दाखल झाले. युवतीचा मृतदेह शवविच्चेदनास जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. उच्च शिक्षित अश्विनीने आत्महत्या का केली. मृत्यु मागे नेमके कोणते कारण असावे याचा शोध पोलीस घेत आहेत.

Post a Comment

0 Comments