मुंबईच्या सांताक्रुझमधील व्यापारी कमलकांत शाह यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाह यांची संपत्ती हडपण्यासाठी त्यांच्या पत्नी ४६ वर्षीय काजल यांनी ४५ वर्षीय प्रियकर हितेश जैनच्या मदतीने कमलकांत यांना जेवणातून विष दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विमा कंपनीत असलेल्या पतीच्या पॉलिसींसंदर्भात आरोपी पत्नीने चौकशी केल्याचे तपासात समोर आले आहे.
“४६ वर्षीय कमलकांत शाह यांच्या रक्तात ‘आर्सेनिक’ आणि ‘थॅलियम’ अतिरिक्त प्रमाणात आढळून आले. १९ सप्टेंबरला शरिरातील सर्व अवयव निकामी झाल्यानंतर शाह यांचा मृत्यू झाला होता. याच लक्षणांमुळे शाह यांच्या आई सरला यांचाही १३ ऑगस्टला मृत्यू झाला”, असे निरिक्षण अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के एस झंवर यांनी आरोपींना पोलीस कोठडी ठोठावताना नोंदवले आहे. आरोपींना न्यायालयाने आठ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
0 Comments