नवीन वर्षाच्या स्वागताला एक दिवस उरला असताना पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी 7 जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त केली आहे.
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 2000 हून अधिक दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. 7 आरोपींमधील काही जणांवर या आधी देखील अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या दोन्ही ट्रकमधून दारू गोव्यातून निघून पुण्यासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या ठिकाणी जात होती.
0 Comments