आळंदीत "चला जाणुया नदीला" उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम


आदित्य डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज लोहगाव येथील एन.एस.एस युनिट ए 157,आळंदी जनहित फाऊंडेशन व आळंदी जनहित फाऊंडेशन, रानजाई प्रकल्प देहू यांचे  माध्यमातून "चला जाणुया नदीला" तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सामाजिक बांधिलकीतून आळंदीत इंद्रायणी नदी घाट परिसरात तसेच इंद्रायणी तीरावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी रक्षा विसर्जन परिसरात विशेष स्वच्छता करून परिसर तसेच स्मारक पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छता करण्यात आली.

यात कॉलेज चे युवक,तरुणी तसेच सेवाभावी संस्था यांची उपस्थिती होती. पसायदान ,माऊली मंदिरात श्रींचे समाधी दर्शन घेवून स्वच्छता अभियान सांगता करण्यात आली. यावभियान मध्ये कार्यक्रम अधिकारी दिलीप घुले, आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आरोग्य निरीक्षक हनुमंत लोखंडे,मुकादम मालन ताई पाटोळे, नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर आदी सहभागी झाले होते. 

माऊली मंदिरात कार्यक्रम अधिकारी दिलीप घुले यांचेसह उपस्थित टीम चा आळंदी देवस्थान तर्फे श्रीफळ प्रसाद देवून माऊली पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला  यावेळी माऊलींचे मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, श्रीकांत लवांडे, नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर उपस्थित होते. यावेळी भागवत काटकर यांनी पर्यावरण व निसर्ग संवर्धन यावर मार्गदर्शन करण्यात केले.

Post a Comment

0 Comments