दामदुपटीच्या आमिषाने तरुणास 31 लाखांना गंडविले

 


तरुणाला पैसे डबल करून देण्याच्या नावाखाली तब्बल ३१ लाखांची फसवणूक झाली. महेश तुकाराम भोळे (वय ३५, रा. आसोदा) खासगी नोकरीत असलेला तरुण सध्या कुटुंबासह जळगावातील सदोबानगरात राहतो.

फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याची ओळख औरंगाबाद येथील अरुण नागोराव अंभोरे यांच्याशी झाली. अंभोरे याने औरंगाबाद एमआयडीसीतील शेंद्रा येथे इंडोपर्ल नावाच्या शिंपल्यापासून मोती तयार करण्याची 'शेती' नावाची कंपनी स्थापन केली. त्यात त्यांची पत्नी, मुलगी व इतर तीन जण संचालक म्हणून काम पाहत आहेत.


Post a Comment

0 Comments