ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

 स्थानिक नागरिक बाबा परब म्हणाले, की ट्रक निगडीहून भोसरीला जात असताना अपघात झाला. दुचाकीस्वार ट्रकखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

यमुनानगर रहिवासी सखाराम सोलंके म्हणाले, की दुर्गानगर चौक हा निगडीमधील एक महत्त्वाचा चौक आहे. येथे वाहतूक सिग्नल आहे; पण वाहतूक पोलीस नसतात. त्यामुळे वाहनचालक वाहतूक नियम पाळत नाहीत. त्यामुळे दररोज छोटे अपघात होत असतात. पण, आज खूप मोठा अपघात होऊन त्यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.

निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ म्हणाले, की 'दुर्गानगर चौकात अपघात घडला आहे. मी पोलीस पथकासोबत घटनास्थळी चाललो आहे.


Post a Comment

0 Comments