धक्कादायक: देवाच्या मुर्तीवरच पुजाऱ्याने धुतले पाय

 


देवाच्या मुर्तीवर पाय ठेवून पाय धुतल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने देवाच्या मुर्तीवर पाय ठेवल्याचं आपल्याला दिसत आहे. तर एक पुजारी त्याच्या पायावर पाणी टाकून जलाभिषेक करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आणि भक्तांनी संताप व्यक्त केला असून हा व्यक्ती मोठा की देव मोठा असा सवाल उपस्थित केला आहे. तर हा व्हिडिओ कुठला आहे याची अधिकृत माहिती अजून समोर आली नाही. पण हा एका मंदिरातील व्हिडिओ असल्याची माहिती असून हा एखाद्या पूजेचा प्रकार आहे का असा सवाल आता निर्माण झाला आहे. तर ही कसली पूजा असा प्रश्नही अनेकांना पडला.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हनुमानाच्या मारूतीसारख्या दिसणाऱ्या मुर्तीवर या व्यक्तीने पाय ठेवले आहे. तर एकजण अभिषेक करत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मागच्या दोन ते तीन दिवसांपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Post a Comment

0 Comments