बेपत्ता आठ वर्षीय बालिकेचा कणसाच्या ढीगात जळालेल्या अवस्थेत सापडला

 


घराशेजारील परीसरात खेळायला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय बालिकेचा जळालेल्या अवस्थेत शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यात बुधवारी सकाळी मृतदेहच आढळला.

साकोली तालुक्यातील पापडा येथेमील बालिका सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता झाली होती. पोलीस घटनास्थली पोहचले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

साकोली तालुक्यातील जंगलव्याप्त पापडा येथील श्रध्दा किशोर सिडाम वय (८) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती तिसऱ्या वर्गात शिकते. सोमवारी संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घराबाहेरील परिसरात खेळण्यासाठी गेली. मात्र घरी आली नाही. उशिरापर्यंत श्रद्धा घरी न परतल्याने घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी रात्री सुमारे १०.३० वाजता आपल्या ताफ्यासह पापडा गाव गाठले. शोधमोहिमेसाठी श्वान पथकही पाचारण करण्यात आले.

मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. बुधवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत मृतदेह गावकऱ्यांना दिसला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता श्रद्धाचा मृतदेह असल्याचे पुढे आले


Post a Comment

0 Comments