डोक्यात खोऱ्या घालून आईचा निर्घृण खून

 


आईने तंबाखूला पैसे न दिल्याच्या कारणावरून रागात येऊन मुलाने आईच्या डोक्यात खोरे घालून तिचा खून केला.

घटना शिरोली तर्फे आळे या ठिकाणी मंगळवारी (दि. १५) घडली. पोलिसांनी या मारेकरी मुलास अटक केली आहे अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

अंजनाबाई बारकु खिल्लारी (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून अमोल बारकु खिल्लारी (वय २३) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद खून झालेल्या महिलेची पती बारकू सखाराम खिलारी (वय ६६) यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीड ते तीनच्या दरम्यान घरात कोणी नसताना आरोपी अमोलने आईकडे तंबाखूसाठी पैशाची मागणी केली. त्यावेळी आईने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. अमोलने मी घर सोडून जाईन अशी आईला धमकी दिली. त्यावेळेला आईने तुला कुठे जायचे तिकडे जा, असे म्हटल्यावर रागात येऊन अमोलने घरातील खोरे आईच्या डोक्यात घालून तिचा खून केला. घटनेचा तपास नारायणगाव पोलिस करीत आहेत.


Post a Comment

0 Comments