बुधवार पेठेतील हाणामारी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल


याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल मोतीपवळे (वय 21, नरेगाव पुणे) या तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्याचे मित्र बुधवार पेठेतील क्रांती चौकात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास थांबले होते. यावेळी दुचाकी घेऊन आलेल्या आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना कट मारून जात होते. फिर्यादीने याचा जाब विचारल्यानंतर दुचाकी वरील तीन अनोळखी तरुणांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर दुसरीकडे लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या पाठीवर वार केला. मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादीच्या मित्रालाही आरोपींनी डोक्यात लोखंडी कोयत्याने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments