पुणे शहरात गांजा विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक

 


पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या छापेमारीत मेफेड्रोन व गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक केली आहे.

कारवाईत 4 लाख 70 हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कोथरुड आणि दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत  शुक्रवारी (दि.25) केली.

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी दत्तवाडी सार्वजनिक रोडवर नरेंद्र रामदास बोराडे (वय-33 रा. अचानक चौक, मुक्ताई रेसीडेन्सी, उत्तमनगर) याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 10 हजार 380 रुपयांचा 519 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करुन दत्तवाडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अ‍ॅड. नुसार गुन्हा दाखल केला. पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोथरुड येथे पेट्रोलींग करत असताना भेलकेनगर कमानीजवळील सार्वजनिक रोडवर रोहन रत्नाकर दळवी (वय-30 रा. सुंदर गार्डर, भेलकेनगर, कोथरुड) आणि कुणाल रमेश पाटील (वय-32 रा. देहु-आळंदी रोड, मोशी) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून 4 लाख 59 हजार 630 रुपये किंमतीचे 29 ग्रॅम 950 मिलीग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
तसेच एक दुचाकी, तीन मोबाईल, पोर्टेबल इलेक्ट्रीक वजनकाटा असा एकूण 5 लाख 65 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींकडे केलेल्या चौकशी त्यांनी हा अंमली पदार्थ इम्रान हसीन सय्यद (रा. तळोजा) याच्या कडून विक्री करता आणल्याचे सांगितले.
आरोपींविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपींना कोथरुड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,
अपर पोलस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर,
पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर,
राहुल जोशी, संदिप शिर्के, नितेश जाधव, विशाल दळवी, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते यांच्या
पथकाने केली.


Post a Comment

0 Comments