गुरुकुल आश्रमातील आणखी 5 मुलीवर अत्याचार

 


म्हसरूळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमाचा नराधम संस्थाचालक हर्षल मोरे याच्याविरोधात पॉक्सोअन्वये बलात्कार व ॲट्रॉसिटीअन्वये आणखी पाच गुन्हे दाखल करण्यात आले.

मोरे याने आश्रमातील चार अल्पयीन व एका १९ वर्षीय पीडितेवर अत्याचार केल्याची गंभीर बाब पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे.

आश्रमातील मुलींना पोलिसांनी विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता पीडित मुलींनी आपबिती सांगितली. यामुळे या नराधम संस्थाचालकाविरोधात नव्याने आणखी पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आदिवासी वाड्या-पाड्यांवरील गोरगरीब मुलींना शिक्षणासाठी आणत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Post a Comment

0 Comments