12 वर्षाचा मुलगा पोहायला गेला अन्... परतलाच नाही

 


सांगली रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या एका डबक्या बुडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

मुलाचं नाव अंश चव्हाण असं आहे. या मुलाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय. अंश आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंशचा जीव वाचवण्यात यश मिळू शकलं नाही. अंशच्या मृत्यूने चव्हाण कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

अंश चव्हाण हा 12 वर्षांचा मुलगा टिम्बर एरिया येथील नवीन वसाहतीमधल्या गुरुद्वाराजवळ राहायला होता. दुपारच्या सुमारास अंश आपल्या मित्रांसोबत गेला. मित्रांसोबत पोहण्यासाठी तो रेल्वे स्थानकाजवळी पाण्याच्या डबक्या उतरला होता.

सांगली रेल्वे स्थानकात खोदण्यात आलेल्या एका खड्ड्यात पाणी साचलं होतं. या पाण्यात तो मित्रांसह पोहत असताना अचानक बुडू लागला. अंश बुडत असल्याचं पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा सुरु केला.

मुलांचा आरडाओरडा ऐकून अखेर स्थानिकांनी डबक्याच्या दिशेने धाव घेतली. नंतर रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. अखेर शोध मोहीम राबवून अंशचा मृतदेह डबक्याच्या बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह सांगली येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

रेल्वे विभागाकडून सांगली स्टेशन नजीक एक भाला मोठा खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यामध्ये पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. याच खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरलेला नाही. याच वेळी पोहण्यासाठी गेला असता अंश याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं आता हळहळ व्यक्त केली जातेय.


Post a Comment

0 Comments