दारू पिताना दोघांची ओळख झाली. दारू पिऊन घराकडे जाताना दोघांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद झाला आणि दारूच्या नशेतच एकाने दुसऱ्याच्या गळ्यावर फुटलेली काच गळ्यात भोसकली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपीने उत्तराखंडला जाण्याची तयारी सुरू केली.
पण गुन्हे शाखा युनिट-5च्या पथकाने त्याच्या डोंबिवलीत मुसक्या आवळल्या.
राकेश पुष्करसिंग डोभाल (20) हा आणि मृत तरुण शाहू नगर येथे 27 तारखेला रात्री एकत्र दारू प्यायले. तेथेच दोघांची ओळख झाली. मग दारूच्या नशेत तर्रर होऊन रात्री उशिरा दोघेही सोबत जात असताना त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे राकेशची सटकली आणि शाहू नगर येथील थंगमनन मंदिरासमोराच्या गल्लीत दोघे आले असता राकेशने त्याला एका आडोशाला खेचले आणि तेथे पडलेल्या फुटलेल्या बाटलीच्या काचेच्या तुकडय़ाने तरुणाच्या गळ्यावर वार केले. मग तो काचेचा तुकडा त्याच्या गळ्यात खुपसला. यामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्यानंतर राकेशने पळ काढला.
याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर युनिट-5चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर, निरीक्षक अजित गोंधळी, एपीआय अमोल माळी व पथकाने संमातर तपास सुरू केला. आरोपीचे नाव राकेश डोभाल असून तो उत्तराखंडचा आहे तसेच गुन्हा केल्यानंतर तो उत्तराखंडला पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती युनिट-5ला मिळाली.
राकेश डोंबिवलीत असल्याचे समजताच पथकाने डोंबिवलीत जाऊन राकेशला गुन्हा घडल्यापासून 48 तासांच्या आत पकडले. राकेश हा शाहू नगर परिसरात एका टेलरकडे कपडे कापायचे काम करत होता.
0 Comments