हॉर्न वाजवण्यावरून वाद तरुणाचे डोके ठेचले

 


मोटारसायकलचा हॉर्न वाजविण्याच्या वादातून तरुणाला टोळक्याकडून जबर मारहाण करून त्याचे डोके पेव्हर ब्लॉकने ठेचल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगावमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे.

गौरव गरुडे (३१) असे या तरुणाचे नाव असून तो व्यवसायाने फोटोग्राफर आहे. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हल्ल्यात जबर जखमी झालेल्या गौरवची प्रकृती चिंताजनक आहे.

यासंदर्भातील अधिक माहिती अशी की, खासगी कंपनीत फोटोग्राफी करणारा गौरव भाऊबीजेच्या दिवशी गोरेगावातील बांगुरनगर परिसरात राहणाऱ्या मित्राला दिवाळीनिमित्त मिठाई देण्यासाठी गेला होता. तिथे मोटारसायकल पार्किंगच्या मुद्द्यावरून स्थानिक तरुणांनी त्याला हटकले. गौरवने थोड्या अंतरावर जाऊन गाडी पार्क केली. मात्र, तिघांनी गौरवशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याला धक्काबुक्कीही केली. त्यास गौरवने प्रतिरोध करताच आणखी तिघेजण घटनास्थळी आले.


Post a Comment

0 Comments