बारामतीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीच्या आईने आणि भावाने प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्रियकराचा भाऊ गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बारामतीच्या माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर परिसरातून ही घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीची आई व भावाला अटक केली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनिता संजय चव्हाण वय 46 वर्ष व मयूर संजय चव्हाण वय 22 वर्ष असे या प्रकरणातील आरोपींची नाव आहेत.
0 Comments