मुंबईची लोकल ट्रेन असो किंवा जीम, मार्केट असो किंवा एखाद्या कार्यक्रम महिलांमध्ये वाद झाल्यावर थेट कुस्ती सुरु होते. आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिले आहेत.
ज्यामध्ये अगदी अनेक वेळा क्षुल्लक कारणामुळे त्यांचा वाद होतो पण त्यानंतर त्या एकमेकांचे केस उपटण्यापासून कपडे फाडण्यापर्यंत तुफान राडा घालतात. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये तर सीट वरुन महिलांची हाणामारी होते. या घटनाचे अनेक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पाहिला मिळतात.
तरुणींची फ्री स्टाइल हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. असाच एक तरुणींचा राडा सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. भरदिवसा कॉलेजच्या मैदानाला या तरुणींनी कुस्तीचं मैदानात रुपांतर केलं होतं. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोघींनी मिळून एका तरुणीला बेदम मारहाण केली. त्या दोघींनी अक्षरशा त्या तरुणीला बेल्टने मारलं.
0 Comments