14 वर्षाच्या ताईने 8 वर्षाच्या बहिणीला संपवलं

 


श्रद्धा वालकरच्या हत्येने आधीच देश हादरलेला आहे. प्रियकर आफताब पूनावालाने तिचे मृत्यूनंतर 35 तुकडे करून जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते.

अशातच महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. घनसावंगी तालुक्यातील गुंजमध्ये 14 वर्षाच्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मृत चिमुकली नाव आहे. 

सोमवारी सकाळी चिमुकली ही काकाच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. तिच्या गळ्यावर, हातावर धारदार शस्त्राचे वार आढळले.तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान धक्कादायक सत्य समोर आले.

चिमुकलीचं आणि लहान मुलीची सतत भांडण होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांना संशय आला होता की, मोठ्या बहिणीने लहान मुलीवर हल्ला केला आहे. कारण मोठ्या बहिणीने तिला मारल्यावर बाथरूममध्ये पाणी ओतलं. त्यानंतर तिने कपडेही बदलले आणि मात्र तिच्या पायाचे ठसे घरात उठले होते.

दरम्यान, चौधरीनगरमध्ये राहणाऱ्या तिच्या काकांकडे चिमुकली शिक्षणासाठी आली होती. ती खरपुडी येथील एका इंग्लिश स्कुलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकत होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी 13 वर्षाच्या चुलत बहिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. शूल्लक कारणावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. मात्र चिमुकलीची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


Post a Comment

0 Comments