तालुक्यातील रत्नापूर येथील टोल नाक्याजवळ ऑटो रिक्षा व एसटी बसमध्ये झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
परमेश्वर सोळंके (वय ३५) , चंदा सोळंके (वय ३०) , ओम सोळंके (वय १२) , सनी सोळंके (वय ११, सर्व रा. कण्हेरगाव नाका हिंगोली ) ऑटोचालक मोहम्मद सिद्धीक (वय २६, रा मानवत) अशी जखमींची नावे आहेत. रिक्षाचालक मोहम्मद रिध्दीक ( क्रमांक एम एच २२ एन ३३६० ) प्रवाशांना पाथरीहून मानवतकडे घेऊन जात होते . एसटी बस ( क्रमांक एम एच ०६ ८५७५ ) ही मानवतहून पाथरीकडे येत होती. चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षाची एसटीला धडक बसली. रिक्षाचालकासह चौघे गंभीर जखमी झाले. रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ बाकळे यांनी प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले ताहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक ताटे करीत आहे .
0 Comments